Menu

देश
सर्जिकल स्ट्राईकनंतर सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सच्या हालचाली

nobanner

सर्जिकल स्ट्राईकनंतर सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सच्या हालचाली

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर सीमेवरचा तणाव तासागणिक वाढत आहे. सीमेवर पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली वाढल्याचं दिसत आहे. काही भागांमध्ये पाकिस्तानी रेंजर्स दिसल्याने सीमेवरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

आरएसपुरा, अरनिया या दोन सीमांवर पाकिस्तानची अॅक्शन टीम आणि लष्कराच्या हालचाली दिसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. तसंच काही दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला झालेल्या उरीजवळच्या सीमेवरही पाकिस्तानी सैन्याची तुकडी दिसल्याची माहिती मिळत आहे.

भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान उत्तर देणार हे अपेक्षित होतं. त्यानंतर सीमेजवळ पाकिस्तान सैन्याचा स्पेशल अॅक्शन ग्रुप दिसला होता. पाकिस्तानला प्रतिकार देण्याची तयारी भारताने केली होती. त्यामुळे भारतीय सैन्यानेही सीमेवरची सुरक्षा चोख ठेवली आहे.

फोटो : भारतीय लष्कराचा अभिमान वाटतो: अक्षय कुमार

akshay 1
उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला आहे. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन, 38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय लष्कराच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती आज महासंचालक (लष्करी कारवाई) डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी दिली. यानंतर बॉलिवूडकरांनी भारतीय लष्कराचं कौतुक केलं आहे. पाहा सुपरस्टार अक्षय कुमार काय म्हणाला.

akshay 2
अक्षय कुमारनं ट्वीट केलं आहे की, ‘दहशतवादविरोधी ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडणाऱ्या भारतीय लष्करावर मला गर्व आहे. सरकारच्या या धाडसी निर्णयानं मी खूश आहे.’

SRK 3
शाहरुख खाननंही ट्वीट केलं होतं. ‘भारतीय लष्करानं दहशतवादाविरोधात केलेल्या कारवाईबाबत धन्यवाद, आपण सगळ्यांना भारतीय लष्करातील जवानांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली पाहिजे.’

Sunny deol 4
सनी देओलनं ट्वीट केलं आहे की, ‘भारतीय सैन्याला सलाम, देशाच्या सुरक्षेसाठी लष्करानं जे काही केलं आहे त्यासाठी सलाम…’

John 5
जॉन अब्राहम म्हणतो की, ‘मला फार अभिमान वाटतोय.’
27 आणि 28 सप्टेंबरच्या रात्री भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील 7 तळांना उद्ध्वस्त झाली. यामध्ये 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर 2 पाकिस्तानी सैनिक ठार झाले.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.