Menu

मनोरंजन
प्रियांकाने मराठमोळ्या शैलीत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

nobanner

दिवाळीला सुरुवात झाली आहे. सर्वत्र आनंदात हा सण साजरा केला जात आहे. मग आपले बॉलीवूडकरही कसे मागे राहतील. बॉलीवूडमध्ये प्रत्येक सण उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सवपासून ते दुर्गा पूजा, ईद असो वा दिवाळी सर्व सण आनंदाने आणि तितक्याच उत्साहाने बॉलीवूडकर साजरे करतात. बॉलीवूड सेलिब्रेटी त्यांच्या चाहत्यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून आज दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. बॉलीवूड आणि हॉलीवूडवर राज्य करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या कामानिमित्त भारताबाहेर आहे. मात्र, घरापासून लांब असूनही प्रियांका तिच्या चाहत्यांना शुभेच्छा देण्यास विसरलेली नाही. बॉलीवूडच्या या देसी गर्लने तिच्या अंदाजात सर्व चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रियांकाने चक्क मराठीत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचसह तिने आगामी व्हेंटिलेटर चित्रपटाची प्रसिद्धीही केली. माझे आवडते दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर तुम्हाला मुख्य भूमिकेत दिसतील. मराठीतील ७० प्रसिद्ध कलाकारांनी यात काम केले आहे. आमच्याकडून तुम्हाला दिवाळीची खास भेट.. व्हेंटिलेटर चित्रपट पाहायला नक्की या.. असा संदेश तिने व्हिडिओच्या शेवटी दिला आहे. प्रियांकाची निर्मिती असलेला व्हेंटिलेटर हा चित्रपट पुढच्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तिने निर्मिती केलेला पहिला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील मोठी स्टारकास्ट पाहायला मिळणार असून अभिनेता- दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ब-याच वर्षानंतर मराठी चित्रपटात झळकणार आहेत.

तसेच, प्रियांकाने ट्विरवर एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. तसेच, व्हिडिओसह सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्हा सर्वांची सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे. देव तुम्हाला प्रेम, सुख समृद्दी देवो असेही लिहले आहे. सध्या प्रियांका चोप्रा क्वांटिका या मालिकेच्या दुस-या सिझनमध्ये व्यस्त आहे. याचसोबत ती बेवॉच या चित्रपटाद्वारे हॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.