Menu

मुंबईतील अनधिकृत झोपडपट्टी मुद्द्यावर शिवसेना-भाजप आमनेसामने

nobanner

निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा शहरातील झोपडपट्टीचा मुद्दा पुढे आलाय. शिवसेनेने हा मुद्दा पुढे आणलाय. मात्र, मित्र पक्ष भाजपने याला विरोध केला आहे. अनधिकृत झोपडयांवरील कारवाईची मर्यादा ही ग्राऊंड प्लस वनपर्यंत शिथील करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

दरम्यान, प्रशासन कायद्याच्या कक्षेत कारवाई करत असेल तर प्रशासनाने ती करायला हरकत नाही, अशी भूमिका भाजपने मांडली आहे. शिवसेनेच्या भूमिकेला भाजपचा विरोध
आहे.१४ फूटांवरील कारवाई टाळायची असेल तर राज्य सरकारकडे दाद मागावी अऩ्यथा आयुक्तांना नियम बदलण्याचा अधिकार नाही, अशी भाजपची भूमिका आहे. त्यामुळे झोपड्यांच्या कारवाईवरून शिवसेना – भाजप आमनेसामने आली आहे.



Translate »