देश
हाजी अलीच्या मजारपर्यंत महिलांना प्रवेश देऊ, अखेर ट्रस्ट नमलं !
अखेर हाजी अली ट्रस्ट सुप्रीम कोर्टात नमलं आहे. कारण हाजी अली दर्ग्याच्या मजारपर्यंत महिलांना प्रवेश देण्यास ट्रस्ट राजी झालं आहे. सुप्रीम कोर्टात ट्रस्टने त्याबाबतचं आश्वासन दिलं आहे.
यापूर्वी भारतीय मुस्लिम महिला आंदोलन या स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ती मान्य करत हायकोर्टाने महिलांना दर्ग्यात प्रवेश देण्याचे आदेश दिले होते. जिथे पुरुषांना जाण्याची परवानगी आहे, तिथे महिलांनाही जाण्याचा अधिकार आहे, असं म्हणत मुंबई हायकोर्टाने हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेशावरील बंदी उठवली होती. 26 ऑगस्ट 2016 रोजी मुंबई हायकोर्टाने यासंदर्भात निर्णय दिला होता.
मात्र हाजी अली ट्रस्टने या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.
यावरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टात ट्रस्टींनी महिलांना मजारपर्यंत प्रवेश देऊ असं सांगितलं. जिथपर्यंत पुरुषांना प्रवेश आहे, तिथपर्यंत महिलांनाही प्रवेश देऊ, असं ट्रस्टींनी सांगितलं.
2011 पूर्वी महिलांना दर्ग्यातील मजारीजवळ जाता येत होतं, मात्र त्यानंतर महिलांना दर्ग्यात बंदी घालण्यात आली, असा दावा महिला संघटनांनी केला आहे. त्याचप्रमाणे युक्तीवादातही हा मुद्दा मांडण्यात आला आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.