अपराध समाचार
कानडी अत्याचाराचा कळस, 35 मराठी भाषिकांना पोलिसांची अमानुष मारहाण
- 599 Views
- November 04, 2016
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on कानडी अत्याचाराचा कळस, 35 मराठी भाषिकांना पोलिसांची अमानुष मारहाण
- Edit
nobanner
मराठी जनतेवरील कानडी अत्याचारानं कळस गाठला आहे. बेळगावमध्ये काळ्या दिनाला काढलेल्या रॅलीत सहभागी झालेल्या 35 कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी अमानुष मारहाण केली आहे.
सीमाभागात 1 नोव्हेंबरला मराठी भाषिकांकडून काळा दिवस पाळण्यात आला होता. यात हजारोंच्या संख्येनं मराठी जनता सहभागी झाली होती. मात्र यातल्या प्रमुख 35 कार्यकर्त्यांना पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली आणि तुरूंगात नेऊन अमानुष मारहाण केली.
अटकेचे वृत्त कळताच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींनी पोलीस स्थानकात जाऊन मारहाण करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची विचारपूस केली.
Share this: