Menu

राजनीति
गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी सुधीर श्रीवास्तव

nobanner

प्रशासनात मुख्य सचिवानंतर सर्वाधिक महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी सुधीर श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी गृहसचिव पदासह इतरही विभागाच्या प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. गृह सचिवपदासाठी सनदी अधिकाऱ्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान, उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवार, वेद्यकीय शिक्षण विभागाच्या मेधा गाडगीळ आणि परिवहन विभागाचे सुधीर श्रीवास्तव यांच्यात रस्सीखेच होती. गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी हे सेवानिवृत्त होत आहेत.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे व नियुक्तीचे ठिकाण: मनोज सौनिक (परिवहन), संजय कुमार (घरबांधणी), व्ही. एस. सिंग (सार्वजनिक आरोग्य), श्रीकांत सिंग (गृह), मनिषा वर्मा (महिला व बालकल्याण), इंदिरा मल्लू (महिला आर्थिक विकास महामंडळ), मिता लोचन (प्रकल्प संचालक, रूसा), नवीन सोना (व्यवस्थापकीय संचालक, कॉटन फेडरेशन), सुजाता सौनिक (अन्न व औषध)

गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी हे सेनावनिवृत्त होत आहेत. त्यामुळे या महत्वाच्या पदावर कोणाची वर्ण लागणार याबाबत मंत्रालयात दावे-प्रतिदावे केले जात होते. पोलीस दलावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच राज्याची कायदा व सुव्यवस्थाही सुरळीत ठेवण्याची महत्वाची जबाबदारी गृहविभागाच्या अप्पर मुख्य सचिवाला सांभाळावी लागते. मंत्रालयात मुख्य सचिवानंतर हे महत्वाचे पद समजले जाते. त्यामुळे या पदावर आपली वर्णी लागावी यासाठी अनेक अधिकारी प्रयत्नशील असतात.