Menu

खेल
दीड दिवसात 103 धावा करा, इंग्लंडला हरवा!

nobanner

टीम इंडियाने इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 236 धावा गुंडाळला आहे. त्यामुळे ही कसोटी जिंकण्यासाठी भारतासमोर अवघ्या 103 धावांचं आव्हान आहे. कसोटीचा आजचा चौथा दिवस आहे.

चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात रवींद्र जाडेजानं गॅरी बॅटी आणि ज्यो रुटला, तर जयंत यादवनं ज्योस बटलरला माघारी धाडून इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडली. पण हसीब हमीदनं ख्रिस वोक्सच्या साथीनं आठव्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी रचून इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

मात्र मोहम्मद शमीनं एकाच षटकात ख्रिस वोक्स आणि आदिल रशिदला बाद करुन इंग्लंडची नऊ बाद 195 अशी अवस्था केली. पण हमीदनं झुंजार अर्धशतक झळकावून इंग्लंडला 236 धावांची मजल मारुन दिली.

हसीब हमीदनं सहा चौकार आणि एका षटकारासह नाबाद 59 धावांची खेळी केली. हमीदनं तळाच्या जेम्स अँडरसनला हाताशी धरुन 41 धावांची भागीदारीही रचली.

भारताकडून रवीचंद्रन अश्विननं तीन, तर मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा आणि जयंत यादवनं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या.