Menu

देश
देशातील सर्वात मोठ्या द्रुतगती महामार्गावर उतरली लढाऊ विमाने…

nobanner

देशातील सर्वात मोठ्या आणि आगरा लखनऊ द्रुतगती महामार्गावर हवाई दलाच्या मिराज २००० चे प्रात्यक्षिक पाहायला मिळाले. उत्तरप्रदेशमधील नव्या महामार्गच्या लोकार्पण सोहळ्यापूर्वी लढाऊ विमाने महामार्गावर उतरुन पुन्हा उड्डाण करताना दिसली. या महामार्गावरील बांगरमऊ आणि गंज-मुरादाबाद दरम्यान तीन किलोमीटरच्या पट्टा हा हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या उड्डाण आणि लॅडिगसाठी निवडण्यात आला आहे. हवाई दलातील कोणकोणती विमाने या ठिकाणाहून उड्डाण करतील याबाबत अद्याप कोणतीही सविस्तर माहिती उपलब्ध नाही. लखनऊपासून ५० किलोमीट अंतरावर असणाऱ्या उन्नानमध्ये करण्यात येणार आहे.
देशातील सर्वात मोठ्या महामार्गासाठी १५ हजार कोटी इतका खर्च करण्यात आला असून या महामार्गाचे काम २३ महिन्यामध्ये पूर्ण करुन कमी कालावधीत हा महामार्ग उभारला असल्याचा दावा उत्तरप्रदेश सरकारने केला आहे. आगरा ते लखनऊ या दोन शहरांना जोडणाऱ्या महामार्ग फिरोजाबाद -मैनपूरी- इटावा- ओरिया- कन्नोज -हरदोई- कानपूर -उन्नाव या शहरातून लखनऊ ला जोडला जाईल. या महामार्गामुळे आगरा -लखनऊ या दोन शहराच्या दरम्यानचे ३०२ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागणारा ५ ते ६ तासांच्या वेळ कमी होऊन हे अंतर कमी वेळात पार करणे शक्य होणार आहे.
यापूर्वी मागील वर्षी भारतीय हवाईदलाने मथुरा जवळच्या राया गावत यमुना महामार्गावर लढाऊ विमान उतरविले होते. युद्दपरिस्थितीमध्ये देशातील किती महामार्ग लढाऊ विमाने उतरविण्यासाठी उपयोगात आणता येऊ शकतात. याची चाचणी म्हणून हवाई दलाने या महामार्गावर देखील मिराज-२००० विमान उतरविण्यात आले होते.