Menu

देश
दोन हजाराच्या नव्या नोटांचं बंडल, दहा लाख रुपये पकडले

nobanner

नोटबंदीमुळे निर्माण झालेला चलन तुटवडा आता कुठे कमी होत आहे. अनेकांच्या हातात दोन हजाराची नोट पडलीही नाही. मात्र तिकडे गुजरातच्या अहमदाबादेत पोलिसांनी एका कुटुंबाकडून तब्बल 12 लाख 40 हजार रुपये जप्त केले आहेत.

त्यातील 10 लाख 60 हजार रुपये हे दोन हजाराच्या नोटामध्ये आहेत. त्या सर्व नव्या नोटा आहेत.

संबंधित कुटुंबाने ही रक्कम लग्नासाठी विविध बँकांमधून काढल्याचा दावा केला आहे. मात्र ते लग्नाशी संबंधित कोणताही पुरावा किंवा लग्नपत्रिका देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे या कुटुंबावरील संशय वाढला आहे.

जप्त केलेल्या रकमेमध्ये दोन हजाराच्या नव्या नोटांसह, पाचशेच्या नव्या नोटाही होत्या.

दरम्यान, सरकारने लग्नासाठी बँक खात्यातून अडीच लाख रुपये काढण्याची मुभा दिली आहे. मात्र त्यासाठी विविध अटी घातल्या आहेत. त्यामध्ये आचारी, मंडप वगैरे आदीचे पैसे रोख द्यायचे असतील तर संबंधितांचे बँक खातं नाही हे सिद्ध करावं लागेल.