Menu

देश
नोटाबंदीविरोधातील ममतांच्या मोर्चाला शिवसेनेची साथ

nobanner

नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात विरोधकांसह मित्रपक्ष शिवसेनेनेही मोदी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या मोर्चामध्ये शिवसेनेचे खासदारही सहभागी होणार आहेत.

राष्ट्रपती भवनपर्यंतच्या या मोर्चात शिवसेना सामील होणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वात शिवसेना खासदार राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. परंतु काँग्रेस या मोर्चात सहभागी होणार नाही.

मातोश्रीवरील खासदारांच्या बैठकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांनी फोनवरुन चर्चा केली. यानंतर उद्धव ठाकरेंनी नोटाबंदीविरोधात विरोधकांच्या मोर्चात शिवसेना सहभागी होणार असल्याची घोषणा केली.