अपराध समाचार
पुणे पोलिसांकडून कुख्यात गुंड श्याम दाभाडेचा एन्काऊंटर
- 808 Views
- November 29, 2016
- By admin
- in अपराध समाचार, देश, समाचार
- Comments Off on पुणे पोलिसांकडून कुख्यात गुंड श्याम दाभाडेचा एन्काऊंटर
- Edit
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या चकमकीत कुख्यात गुंड श्याम दाभाडे आणि त्याचा साथीदार धनंजय शिंदे ठार झाला आहे. तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके हत्या प्रकरणात श्याम दाभाडे मुख्य आरोपी होता.
पोलिस गेल्या अनेक दिवसांपासून दाभाडेच्या शोधात होते. चाकणमधील वरसाई देवी डोंगर परिसरात श्याम दाभाडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने त्याचा पाठलाग केला.
पोलिसांनी श्याम दाभाडे आणि त्याच्या साथीदाराला वेढा घातल्यानंतर शरण यायला सांगितले. यावेळी दाभाडेने पोलिसांवर 9 राऊंड फायर केले. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी 5 राऊंड फायर केले. त्यात गुंड श्याम दाभाडेसह त्याचा साथीदार धनंजय शिंदेही ठार झाला. श्याम दाभाडेकडे 4 पिस्तूल, एक कट्टा आणि 42 राऊंड्स मिळाले.
दाभाडेवर राज्यभरात 22 गंभीर गुन्हे
तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्या प्रकरणात गुंड श्याम दाभाडे मुख्य आरोपी होता. सचिन शेळके यांच्या हत्येसह श्याम दाभाडेवर आणखी 3 हत्येचे गुन्हे, 3 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे, तसेच खंडणी आणि दरोडा असे एकूण 22 गुन्हे पुण्यासह राज्यातील अनेक शहरात दाखल आहेत. तळेगाव, मावळ परिसरात गुंड श्याम दाभाडेची प्रचंड दहशत होती.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.