राजनीति
सांगोला, दुधनीमध्ये भाजप तर कुर्डुवाडीत शिवसेनेचा नगराध्यक्ष
अक्कलकोट येथे काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या वर्चस्वाला धक्का बसला असून येथे नगराध्यक्षपदी भाजपच्या शोभा खेडगी यांनी बाजी मारली आहे. आमदार म्हेत्रे यांच्या स्वतःच्या गावी दुधनी येथे भाजपचे भीमाशंकर इंगळे हे विजयी झाल्याने म्हेत्रे गटाची तब्बल ६० वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आली आहे. म्हेत्रे यांच्या हुकूमशाहीविरोधात मतदारांनी दिलेला हा कौल आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते तथा सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी दिली आहे.
शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनाही सांगोला येथे धक्का बसला आहे. याठिकाणी शेकाप व राष्ट्रवादी आघाडीने बहुमत कायम राखले गेले तरी नगराध्यक्षपदावर भाजप-शिवसेना महायुतीचा उमेदवार विजयी झाला आहे.
बार्शी येथे राष्ट्रवादी ६ व शिवसेना ६ जागांवर विजयी. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी आघाडीवर आहे. याठिकाणी भाजपचे कमळ कोमेजले आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्शीत सभा घेतली होती.