खेल
Live Cricket Score of India vs England, 1st Test, Day 5
राजकोट स्टेडियमवरील पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली असून भारतीय संघाच्या गोलंदाजांना अद्याप यश आलेले नाही. इंग्लंडची सलामीजोडी अजूनही मैदानात तग धरून उभी आहे. चौथ्या दिवशी इंग्लंडच्या संघाकडे १६३ धावांची आघाडी होती. त्यात आता भर पडत असून भारतीय संघासमोर अडचणीत वाढ होत आहे. सामना अनिर्णित राहिल असेच चित्र सध्याच्या स्थितीनुसार दिसत आहे.
इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५३७ धावांचा पाठलाग करणाऱया भारतीय संघाचा डाव चौथ्या दिवशी ४८८ धावांत संपुष्टात आला होता. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात ४९ धावांची घेता आली. दुसऱया डावात इंग्लंडच्या सलामीवीरांनी मैदानात टीच्चून फलंदाजी करत शतकी भागीदारी रचली आहे. इंग्लंडच्या हसीब हमीद याने आपले पहिलेवहिले कसोटी अर्धशतक पूर्ण केले, तर कर्णधार कूक यानेही अर्धशतक गाठले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडची धावसंख्या बिनबाद ११४ अशी असून हमीद नाबाद ६२ , तर कूक ४६ धावांवर खेळत होते. इंग्लंडची भक्कम आघाडीच्या दिशेने वाटचाल होत आहे. इंग्लंडचा दुसरा डाव स्वस्तात गुंडाळण्याची आवश्यकता असताना भारतीय गोलंदाज निराशाजनक कामगिरी करत असल्याने कसोटी जिंकण्याची शक्यता धूसर होताना दिसत आहे.