राजनीति
आधी भ्रष्टाचाराचा विरोध व्हायचा, आता भ्रष्टाचार रोखण्याच्या निर्णयाचा होतो- पंतप्रधान मोदी
nobanner
डिजीटल अर्थव्यवस्था हा जगण्याचा भाग बनायला हवा, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केले आहे. अर्थव्यवस्था डिजीटल झाल्यास ती पारदर्शक आणि कार्यक्षम होईल, असेदेखील पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. भाजपच्या संसदीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांना संबोधित केले.
‘आधी विरोधक २जी आणि कोळसा घोटाळ्यातील भ्रष्टाचाराचा विरोध करण्यासाठी सरकारविरोधात एकत्र यायचे. मात्र आता विरोधक भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात एकत्र येत आहेत,’ अशा शब्दांमध्ये नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर थेट हल्ला चढवला. ‘काँग्रेससाठी देशापेक्षा त्यांचा पक्ष महत्त्वाचा आहे. मात्र भाजपसाठी देशहित महत्त्वाचे आहे,’ असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
Share this: