Menu

अपराध समाचार
कोपर्डी बलात्कार खटला 2 जानेवारीपर्यंत तहकूब!

nobanner

कोपर्डी बलात्कार खटल्याची सुनावणी 2 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. चौथ्या दिवसाच्या सुनावणीत वैद्यकीय अधिकाऱ्याची साक्ष नोंदवण्यात आली.

डॉक्टरांनी घटनाक्रम सांगून पीडितेच्या शरीरावर जखमांचे व्रण असल्याचं सांगितलं. शरीरावर अनेक जखमा होत्या. त्याचबरोबर पीडीतेचे खांदे निखळले असल्याची साक्ष दिली.

दुसरीकडे मुख्य आरोपीचे वकिल योहान मकासरे यांची उलट तपासणी पूर्ण झाली. मात्र भैलुमेच्या वकिलांनी मेडिकल रजिस्टरची कागदपत्रे अवश्यक असल्याचं सांगितल्यानं, दोन जानेवारीपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं.

दोन जानेवारीपासून पुन्हा सलग न्यायालयीन कामकाजाला सुरुवात होणार आहे.