Menu

देश
गडचिरोलीत सुनेच्या विजयी मिरवणुकीत सासऱ्याला हार्ट अटॅक

nobanner

गडचिरोलीत विजयी उमेदवाराच्या जल्लोषात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुनेच्या विजयाचा जल्लोष साजरा करताना सासऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

गडचिरोलीतील प्रभाग क्रमांक 8 मधून भाजपच्या उमेदवार मंजुषा आखाडे विजयी झाल्या. त्यांच्या विजयाचा जल्लोष करताना त्यांचे सासरे सुरेश आखाडे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

तिसऱ्या टप्प्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहे. या गडचिरोलीत भाजपने मुसंडी मारली आहे. गडचिरोलीत पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली आहे. मात्र विजय उमेदवाराच्या सासऱ्याच्या मृत्यूने एकीकडे आनंद तर दुसरीकडे दु:खाचं वातावरण आहे.