खेल
जिन गेंदबाजों का सामना किया उनमें मैकग्रा महानतम तेज गेंदबाज: द्रविड़
ऑस्ट्रेलियातील क्रिकेट संस्कृती भारतीय क्रिकेटपेक्षा खूप वेगळी राहिली आहे. ऑस्ट्रेलियात क्रिकेट सामने खेळवले जात असतील तर इनिंग ब्रेकमध्ये प्रेक्षकांना अगदी स्टेडियममधून जाण्याची मुभा असते. इतकेच नाही, तर सामना सुरू असताना ऑस्ट्रेलियात क्रिकेटपटू सीमारेषेवर चाहत्यांना स्वाक्षरी देताना त्यांच्यासोबत सेल्फी टीपतानाही दिसतात. भारतात चाहत्यांना सीमारेषेजवळ येण्याची परवानगी नाही. याशिवाय, आता ऑस्ट्रेलियातील अॅडलेड ओव्हल स्टेडियममध्ये चाहत्यांना स्टेडियमच्या छप्परावर बसून सामना पाहण्याचीही सुविधा लवकरच सुरू करून दिली जाणार आहे. एकंदर ऑस्ट्रेलियातील स्टेडियममध्ये सामना पाहण्याची मजाच वेगळी असते. आता ऑस्ट्रेलियातील क्रिकेटपटू एका वेगळ्याच विक्रमाची नोंद करण्यासाठी सज्ज झाले आहेत..
सिडनीच्या स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचे काही मातब्बर खेळाडू आणि प्रशिक्षक एकूण ५०० मुलांना एकाच वेळी क्रिकेटचे धडे देणार आहेत. एकाच वेळी पाचशेहून अधिक मुलांना क्रिकेटचे धडे देण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. त्यामुळे याची नोंद गिनीज बुकमध्ये होणार आहे. सिडनीच्या स्टेडियमवर घेण्यात येणाऱया या शिबीरात ऑस्ट्रेलियाचे पीटर सिडेल, नेथन लायन, मिचेल मार्श, पीटन नेवील, हेलिटन या खेळाडूंसह संघाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन देखील उपस्थित असणार आहेत. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररणाचे विद्यार्थ्यांना धडे देण्यात येणार असून अर्ध्या तासाचे हे शिबीर असणार आहे. आपल्या आवडत्या क्रिकेट स्टारकडून क्रिकेटचे धडे घेण्याची नामी संधी ऑस्ट्रेलियातील विद्यार्थ्यांना यामुळे उपलब्ध झाली आहे. याआधी ऑस्ट्रेलियातच एकाच वेळी २५० विद्यार्थ्यांना क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यात आले होते. आता हा विक्रम मोडीत काढण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. या संपूर्ण कार्यक्रमावर गिनीज बुककडून १५ सदस्यीय समिती लक्ष ठेवणार असून शिबीराचा वेळ, सहभागी विद्यार्थ्यांची संख्या आणि प्रशिक्षणाचे मुल्यमापन या समितीकडून केले जाणार आहे.