Menu

देश
तुमचं सोनं, मोदी सरकार आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

nobanner

नोटाबंदीनंतर घरातील सोन्याबाबत पसरल्या जाणाऱ्या अनेक अफवा मोदी सरकारने खोडून काढल्या आहेत.

सोन्याबाबत कोणताही नवा नियम केलेला नाही, तसंच कोणतंही नवं बंधन घातलेलं नाही, असं सरकारने स्पष्ट केलं
सरकारने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात अतिशय स्पष्ट आणि सौम्य शब्दात म्हटलं आहे.

घरातील सोन्याबाबत 22 वर्षांपूर्वी जो नियम बनवला होता, तोच नियम कायम असेल.
मात्र काही दिवसापांसून सोन्यावरही 85 टक्के कर लावणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात होत्या. त्या सर्व अफवा सरकारने खोडून काढल्या आहेत. तसंच नोटाबंदीनंतर 500-हजाराच्या जुन्या नोटा खपवण्यासाठी जे लोक सोन्यात गुंतवणूक करून, काळा पैसा पांढरा करतील किंवा तो सोन्यात बदलवतील, त्यांनी मात्र सावध राहण्याची गरज आहे.
तसंच तुमच्या पारंपारिक सोन्याबाबत कोणताही हिशेब द्यावा लागणार नाही असंही सरकारने स्पष्ट केलं आहे.

मात्र त्याचवेळी कर तफावतीमुळे जर आयकर विभागाने छापेमारी केली, तर आयकर अधिकारी तुमच्या घरातील कोण-कोणत्या सोन्याचा हिशेब मागू शकणार नाहीत, हे सुद्धा सरकारनेच स्पष्ट करत, नागरिकांच्या मनातील गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

*पिढीजात सोने आणि दागिन्यांवर कर नाही*

तुमच्या मनात सोने किंवा दागिन्यांबाबत भीती असल्यास ती दूर करा. इमानदारीने, कष्टाने कमावलेल्या पैशातून घेतलेल्या सोन्यावर कोणताही नवा कर नसेल.

*छापेमारीदरम्यान आयकर अधिकाऱ्यांना याचा जाब विचारता येणार नाही*

विवाहित महिलेकडील 500 ग्रॅम म्हणजेच 50 तोळे सोनेअविवाहित महिला म्हणजेच घरातील मुलीकडील 250 ग्रॅम म्हणजेच 25 तोळे सोनेपुरुषांकडील 100 ग्रॅम म्हणजेच 10 तोळे सोनेयापेक्षा जास्तीचं सोने तुमच्याकडे असेल, आणि ते तुम्ही घोषित उत्पन्नातून खरेदी केलं असेल, तरीही घाबरण्याचं कारण नाही.म्हणजेच तुम्ही कितीही सोने जवळ ठेवू शकता.समजा, तुमच्याकडे 100 तोळे सोने सापडले आणि ते सोने तुम्ही पारंपारिक/पिढीजात असल्याचं सांगितल्यास, तुमच्यावर काहीही कारवाई होणार नाही.