मनोरंजन
देशभरातील 3500 थिएटरमध्ये शाहरुखच्या ‘रईस’चा ट्रेलर रिलीज होणार
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट‘रईस’चा ट्रेलर आज रिलीज होणार आहे. 11.45 वाजता यशराज स्टुडिओमध्ये हा ट्रेलर रिलीज होईल. या सोहळ्याला शाहरुख खान, नवाजुद्दीन सिद्दकी, दिग्दर्शक राहुल ढोलकिया, निर्माता रितेश सिधवानी उपस्थित राहणार आहे.
या सिनेमात शाहरुख खानसह पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान दिसेल. मंगळवारीही या चित्रपटाचा नवा पोस्टर रिलीज झालं होतं. हे पोस्टर शेअर करताना शाहरुखने लिहिलं होतं की, ‘आज रईसचं नवं पोस्टर पाहा …उद्या ट्रेलर पाहायला मिळेल. आता #ApnaTimeShuru!
एक्सेल एंटरटेनमेंट, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि यूएफओ डिजिटल सिनेमाच्या माहितीनुसार, देशभरातील 3500 चित्रपटगृहांमध्ये हा ट्रेलर रिलीज होणार आहे. शाहरुख खान व्हिडीयो कान्फरन्सिंगद्वारे दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरु, अहमदाबाद, जयपुर या शहरातील प्रेक्षकांशी संवाद साधणार आहे.
राहुल ढोलकिया दिग्दर्शित ‘रईस’ची कथा 1980 च्या दशकातील गुजरातवर आधारित आहे. ही कथा एका दारु तस्कर रईस खानभोवती फिरते. रईसची भूमिका शाहरुखने साकारली आहे. 26 जानेवारी 2017 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.