मनोरंजन
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर येणार चित्रपट?
एकदिवसीय आणि ट्वेंटी २० क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याच्यावर बनलेल्या ‘एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटात काम केल्यानंतर अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आता आणखी एका बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कंगना रणौतच्या अभिनयाची प्रशंसा करत तिच्यासोबत काम करण्याची इच्छा असल्याचे सांगणा-या सुशांतला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील चित्रपटात काम करायचे आहे.
सुशांतचे म्हणण्यानुसार त्याला संधी मिळाली तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बनणा-या बायोपिकमध्ये नक्कीच काम करेल. एका प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला की, मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बायोपिकमध्ये काम करायला आवडेल. मला कठीण भूमिका साकारायला आवडतात. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक, नोटाबंदी, सोने व्यापारावर मर्यादा असे अनेक धडाकेबाज व खळबळजनक निर्णय घेऊन विरोधकांना पळता भुई थोडे करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चित्रपट येण्यास आता जास्त वेळ लागणार नाही अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. कॅप्टन कूल धोनीवर बनलेल्या चित्रपटात सुशांतने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटानेही धोनीप्रमाणेच उत्तम कामगिरी केली होती. बॉक्स ऑफीसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. तसेच, चित्रपटातील सुशांतच्या कामाचीही सर्वांनी प्रशंसा केलेली. भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीवर बनलेल्या ‘एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी’ या बायोपिकने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत १०० कोटींवर गल्ला जमविला होता. यावर्षी ३० सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दोन आठवड्यांत १२१.४८ कोटी इतकी कमाई केलेली. हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ आणि तेलगु भाषेतही प्रदर्शित झाला होता.
छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरला सुरुवात करणारा सुशांतसिंग राजपूत आता मोठ्या पडद्यावर बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाला आहे. ‘एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाने सुशांतला फक्त प्रसिद्धीच नाही तर भरपूर पैसाही मिळवून दिला. पण या ३० वर्षीय अभिनेत्याला त्याला किती पैसे मिळतात याने काहीही फरक पडत नाही. त्याच्यासाठी कामातली गुणवत्ता महत्त्वाची. सुशांत म्हणतो की, ‘तुम्ही माझ्यासमोर कॅमेरा ठेवा किंवा लाइव्ह परफॉर्मन्स असो, माझे कॅमेऱ्याशी नाते बदलत नाही. फक्त बदलतो तो पैशांचा धनादेश. मी याला अधिक महत्त्व देत नाही. मी पैशांबाबत विचारही करत नाही. कधी मला कंटाळा आलाच तर मी एखादी महागडी बाइक विकत घेतो. पण मला हेही माहित असतं की त्याचा मला काही उपयोग नाही.’
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.