Menu

अपराध समाचार
बारामतीमध्ये 6 कोटी 89 लाख रुपये जप्त, सर्व जुन्या नोटा

nobanner

पुण्यातील बारामतीमध्ये 6 कोटी 89 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने भिगवण टोलनाक्यावर ही कारवाई केली आहे.

जप्त केलेली रक्कम बारामती सहकारी बँकेची असल्याचं कळतं. निवडणूक यंत्रणा अधिकारी, पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पडताळणीचं काम सुरु आहे.

दरम्यान सापडलेल्या सहा कोटी 89 लाख रुपयांमध्ये सर्व नोटा एक हजार आणि पाचशेच्या आहेत.