देश
राष्ट्रगीतादरम्यान उभे न राहणाऱ्यांना कारगिलला पाठवा
बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्यने चित्रपटगृहात राष्ट्रगीताच्यावेळी जे उभे राहणार नाहीत त्यांना कारगिलला पाठवावे असे म्हटले आहे. भट्टाचार्यने केरळ येथे केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राष्ट्रगीताच्यावेळी उभे न राहिलेल्या सहाजणांना अटक करण्यावर आपली प्रतिक्रिया देताना एक ट्विट केले. त्याने पीटीआयचे ट्विट शेअर करताना लिहिले की, ‘त्यांना कारगिलला पाठवा, -५० डिग्री वातावरणात त्यांना सोडा. जयहिंद.’ आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राष्ट्रगीताच्या अपमानाबाबतीत दोन घटना समोर आल्या आहेत.
चेन्नईतल्या एका चित्रपटगृहात रविवारी राष्ट्रगीतादरम्यान उभे न राहणाऱ्या आठ लोकांना मारहाण करण्यात आली, ज्यात तीन महिलांचा समावेश होता. साधारणपणे २० लोकांनी या आठ लोकांची मारहाण केल्याचा आरोप पीडितांनी केला. तर केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राष्ट्रगीतावेळी उभे राहण्यास मनाई केलेल्या सहा जणांना राष्ट्रगीताचा अपमान केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले.
अभिजीत याच्या भाषेवरुन ट्विटरकरही त्याच्यावर नाराजच असतात. नोटाबंदीचा विरोध करणाऱ्यांवर टिपणी करताना अभिजीतने ट्विट करत म्हटले की, रहिमन लाठी राखिये, सरसो तेल पिलाय। जाने कल किस मोड़ पे, बंद समर्थक मिल जाये। ऐसी लाठी पेलिये, भाग सके न कोई। बंद-2 फिर ना करे,जब लाल *** होइ।”