Menu

देश
अण्णा हजारे’, ‘अजित पवार’ पोस्टात कामाला, घोटाळेबाजांचा प्रताप

nobanner

भ्रष्टाचारासाठी काय शक्कल लढवल्या जातील याचा काही नेम नाही. आता मुंबईतील पोस्ट ऑफिसमध्ये चक्क अजित पवार, अण्णा हजारे यांच्यापासून ते उत्तरप्रदेशमधील अखिलेश यादव यांच्या नावाने भ्रष्टाचार झाला आहे.
पोस्ट ऑफिसमध्ये कंत्राटी स्वरुपात कामगार नेमले जातात. १२ महिने काम केल्यास या कामगारांना कामयस्वरुपी नोकरीवर ठेवावे लागते. मुंबईतील १२ पोस्ट ऑफिसमध्ये २५० कंत्राटी कामगार होते. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार यातील काही तरुणांचे नाव दर महिन्याला नाव बदलण्यात आले. विशेष म्हणजे या तरुणांचे नामकरण करताना थेट राजकारणी, समाजसेवकांचा आधार घेण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे नाव एका तरुणाला देण्यात आले. तर उर्वरित तरुणांना अजित पवार, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, रामगोपाल यादव ते अगदी मराठी अभिनेता सुबोध भावेचे नावही एका तरुणाला देण्यात आले. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराचा वापर केला आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला. पोस्ट ऑफिसमधील हा भ्रष्टाचार समोर येताच या तरुणांना कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. घोटाळ्याशी काही अधिका-यांचे संबंध असल्याचे समोर येत आहे. भ्रष्टाचार करणारे आणि तरुणांची फसवणूक करणा-या अधिका-यांची सखोल चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
अण्णा हजारेंना ७ हजार पगार
माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांमधून माहिती समोर आली आहे. यात ज्या तरुणाला अण्णा हजारेचे नाव दिले त्या तरुणाला सात हजार पगार होता. त्यामुळे पोस्ट ऑफीसच्या कागदपत्रांमध्ये अण्णा हजारे – पगार सात हजार असा उल्लेख आढळतो.