Menu

अपराध समाचार
अवघ्या काही तासांमध्ये नागपुरात दोन हत्येच्या घटना

nobanner

नागपुरमध्ये एकाच दिवसात दोन हत्येच्या घटना घडल्या आहेत. तुकाराम नगरमध्ये एका कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली आहे. तर सदर बाजारात वेल्डिंग दुकानदाराची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तुकाराम नगरातील रहिवाशी वस्तीत बाल्या गावंडे या कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली. बाल्या गावंडे एका पार्टीसाठी आला असताना त्याची काहीजणांनी मिळून हत्या केली. यानंतर बाल्या गावंडेचा मृतदेह जवळच्या झुडूपांमध्ये फेकून देण्यात आला. सकाळी स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. आता पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
नागपुरमधील सदर बाजार या नेहमी वर्दळ असलेल्या परिसरात एका वेल्डिंग दुकानदाराची हत्या करण्यात आली. वैयक्तित वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. ही हत्या नेमकी कोणी केली, याचा तपास अद्याप लागलेला नाही. एकाच दोन दिवसात दोन हत्या झाल्याने नागपुरच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.