देश
ठाण्यात घरफोड्या करणारी टोळी सापळ्यात, १३ जणांना अटक
- 424 Views
- January 04, 2017
- By admin
- in अपराध समाचार, देश, समाचार
- Comments Off on ठाण्यात घरफोड्या करणारी टोळी सापळ्यात, १३ जणांना अटक
- Edit
nobanner
घरफोड्या करणारी एक मोठी टोळी ठाणे पोलिसांनी उध्वस्त केलीय. १३ जणांना पोलिसांनी अटक केलीय. त्यांच्याकडून ५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ठाण्यातील कापूरबावडी, मुंब्रा, भिवंडी, वसई इथून सदर आरोपिंना अटक करण्यात आलीय. या 13 जणांनी ठाणे पोलीस आयुक्तालय आणि मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घरफोड्या केल्याचं उघड झाले आहे. भिवंडी पोलिसांनी घरफोड्या करणाऱ्या शिकलकर टोळीला अटक केली आहे.
त्यांच्याकडून 755 ग्राम सोनं, 14 किलो चांदी असा मुद्देमाल हस्तगत केलाय. तर नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत भिवंडी गुन्हे अन्वेषण विभागाने तिघांना अटक केलीय, हे तिघे गोडाऊन फोडून चोऱ्या करायचे.
Share this: