Menu

राजनीति
धार्मिक फोटो हटवण्याबाबतचे परिपत्रक सरकार रद्द करणार

nobanner

सरकारी आस्थापनांमधून धार्मिक फोटो परिपत्रक रद्द करण्यात येणार आहे. आज शिवसेनेच्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या परिपत्रकाविषयी पक्षाची नाराजी बोलून दाखवली. या बैठकीनंतर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी परिपत्रक रद्द करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती दिली आहे.

सरकारी आस्थापनांमधून धार्मिक फोटो सन्मानपूर्वक काढण्याचे निर्देश सरकारनं काढले आहेत. या परिपत्रकाला शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. काल शिवसेनेच्या मेळाव्यात युती तोडण्याच्या घोषणेआधी उद्धव ठाकरेंनी या मुद्द्यावरून सरकारवर टीकास्त्रही सोडलं होतं.