अपराध समाचार
नागपुरात २ कोटींची दारू जप्त
- 512 Views
- January 01, 2017
- By admin
- in अपराध समाचार, देश, समाचार
- Comments Off on नागपुरात २ कोटींची दारू जप्त
- Edit
नागपुरात रेल्वे सुरक्षा बलच्या कर्मचाऱ्यांनी २ कोटींची दारू जप्त केलीये. रेल्वे गाड्यातून हि दारू पाठवली जात होती.
मिळालेल्या माहितीप्रमाणे नवी दिल्ली ते चेन्नईला जाणाऱ्या ग्रँड ट्रॅक एक्सप्रेस आणि तामिळ नाडू एक्सप्रेसहुन दारू जात असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
नियमानुसार रेल्वेतून दारूची वाहतूक करता येत नाही पण तरीही या याप्रकारे दारू पाठवणाऱ्या व्यक्तीने वॅगन भाड्याने घेत त्यातून दारूचा हा साठा पाठवण्याचा प्रयत्न केला होता.
रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी दारूच्या बाटल्या भरलेले ग्रँड ट्रॅक एक्सप्रेस मधून ७० डब्बे तर तामिळ नाडू एक्सप्रेसहुन ११८ डब्बे जप्त केले. नवीन वर्षाच्या निमित्ताने हा दारूचा साठा चेन्नईला पाठवला जात असल्याची आशंका व्यक्त होत असली तरीही अदयाप हा साठा कुणाचा आणि त्या संबंधीचे अधिक तपशील नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांना याबद्दल अधिक माहिती सांगता आला नाही.