अपराध समाचार
नाशकात मुलगी-जावयाकडून महिलेची 31 लाखांना फसवणूक
- 549 Views
- January 23, 2017
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on नाशकात मुलगी-जावयाकडून महिलेची 31 लाखांना फसवणूक
- Edit
nobanner
नाशिकमध्ये मुलीनं आपल्या पतीच्या मदतीनं आईची तब्बल 31 लाख 21 हजारांना फसवणूक केली आहे. स्मिता पाटील आणि विजय पाटील असं फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याचं नाव आहे. स्मिताची 61 वर्षीय आई 2011 पासून जावयाकडेच राहत होती.
सासूच्या आर्थिक निरक्षरतेचा फायदा घेत जावयानं त्यांच्या बँकेतील जाईंट अकाऊंटमधून वेळीवेळी पैसे काढले. विशेष म्हणजे त्यांची मुलगीही जावयाला सामील होती. काही दिवसांपूर्वी हा प्रकार लक्षात येताच महिलेने जावयाकडे पैशांची विचारणा केली. त्यावेळी विजय पाटीलनं पैसे देण्यास नकार दिला.
उलट सासूच्या नावे असलेली जमीन विकताना आलेल्या रकमेपैकी आणखी 1 लाख रुपये देण्याची मागणी विजयने केली. पैसे न दिल्यास त्यांच्या मुलाला जीवे मारण्याचीही धमकी दिली. महिलेच्या तक्ररीनंतर उपनगर पोलिस स्टेशनमध्ये मुलगी आणि जावयावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Share this: