अपराध समाचार
भाजप कार्यकर्त्यावर 20 ते 25 जणांचा जीवघेणा हल्ला
- 799 Views
- January 14, 2017
- By admin
- in अपराध समाचार, देश, समाचार
- Comments Off on भाजप कार्यकर्त्यावर 20 ते 25 जणांचा जीवघेणा हल्ला
- Edit
nobanner
उल्हासनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 20 ते 25 जणांनी केलेल्या हल्ल्यात गुरदीप सिंग गंभीर जखमी झाला आहे.
जवळपास 20 ते 25 जणांनी गुरदीप सिंग याच्यावर तलवारी आणि चॉपरने हल्ला केला. आरोपी कोण आहेत याबाबत अद्याप कुठलीही माहिती नसून हल्ल्याचं कारणही अस्पष्ट आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा गुरदीपवर हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गुरदीपवर सेंट्रल हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात उपचार सुरु आहेत.
Share this: