देश
सॅमसंग कंपनीच्या उपाध्यक्षांना अटक होण्याची शक्यता
nobanner
जगातल्या सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक कंपन्यांपैकी एक असणाऱ्या सॅमसंगचे उपाध्यक्ष ली जोई याँग यांना अटक होण्याची शक्यता आहे. सॅमसंग ही सध्या जगातली सर्वाधिक मालमत्ता असणारी इलेक्ट्रोनिक्स कंपनी आहे.
या कंपनीचं प्रतिनिधीत्व दक्षिण कोरियाच्या संसदीय समितीसमोर करत असताना शपथेवर खोटं बोलल्याचा जोई याँग यांच्यावर आरोप आहे.
दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क घ्यून हाई यांना नुकतचं एका लाचखोरीच्या प्रकरणात महाभियोग चालवून पदावरून हटवण्यात आलंय. या प्रकरणात सॅमसंगच्या मालकांनी तब्बल ३ कोटी ६० लाख डॉलर्सची लाच तत्कालीन राष्ट्रपतींना दिल्याचा आरोप आहे.
Share this: