देश
अकोला-सिकंदराबाद रेल्वे मार्गावर दगड, मोठी दुर्घटना टळली
रेल्वे रुळावर आडवा रॉड टाकल्याच्या मुंबईतील घटना समोर आल्यानंतर आता अकोला- सिकंदराबाद रेल्वे मार्गावरही बार्शिटाकळी तालुक्यातील अनकवाडी – लोहगड दरम्यान भला मोठा दगड आढळून आला आहे.
या मार्गावरून जाणाऱ्या ‘इंटरसिटी एक्सप्रेस’ला सुदैवाने कोणताही धोका निर्माण झाला नाही. काल संध्याकाळी 5.30 वाजताची घटना ही घटना असून अज्ञात व्यक्तीविरोधात बार्शिटाकळी पोलिसांत गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
दगड मोठा अस्लयाने रूळांमधील सिमेंट खांबाला तडे गेले आहेत. त्यामुळे दुरस्ती सुरु असून वाहतूकही सुरळीत आहे.
मुंबई आणि उपनगरात तीन दुर्घटना टळल्या
दरम्यान मुंबई आणि उपनगरात मोटरमनच्या सतर्कतेमुळे आतापर्यंत तीन दुर्घटना टळल्या आहेत. मुंबई आणि उपनगरी परिसरात मोठा रेल्वे अपघात घडवण्याचं षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नवी मुंबईत गव्हाणफाटा जवळ रेल्वे ट्रॅकजवळ विजेचा खांब ठेवल्याचं समोर आलं. त्यामुळे मोठा घातपात घडवण्याचा कट शिजत असल्याची भीती वर्तवली जात आहे.
आठवड्यात दुसऱ्यांदा अशाप्रकारे रेल्वे ट्रॅकवर संशयास्पद वस्तू आढळली आहे. मंगळवारी नवी मुंबईतील कळंबोली भागात रेल्वे रुळांवर लोखंडी रॉड ठेवल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर बुधवारी पनवेलपासून जवळ असलेल्या गव्हाणफाटा येथे रेल्वे ट्रॅकवर विजेचा खांब ठेवण्यात आला.हा रेल्वेमार्ग जेएनपीटीकडे जाणारा आहे.
जेएनपीटी बंदरात येणारा माल हा मालगाड्यांच्या माध्यमातून आणला जातो. त्यासाठी या रेल्वेमार्गाचा वापर होतो. या प्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत दोन वेळा संबंधित रेल्वेगाड्यांच्या मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठे अपघात टळले आहेत.
रेल्वे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर?
गेल्या महिन्यात ओडिशाच्या सीमेजवळ असलेल्या आंध्र प्रदेशमधील कुनेरु स्टेशनजवळ जगदलपूर-भुवनेश्वर एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरुन घसरले होते. या रेल्वे अपघातात 39 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता.
कानपूरमध्येही नोव्हेंबरमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेमागे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंदूर-पटना एक्स्प्रेसचा 20 नोव्हेंबर 2016 रोजी कानपूरच्या पुखराया स्टेशनजवळ भीषण अपघात झाला होता. ज्यामध्ये 150 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.