Menu

दुनिया
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘ट्रेड वॉर’च्या निशाण्यावर भारत

nobanner

भारत, इंडोनेशिया, मलेशिया आणि व्हिएतनाम हे आतापर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या व्यापारी नीतीपासून बचावल्याचे दिसते. परंतु, ही परिस्थिती जास्त दिवस टिकण्याची शक्यता कमी आहे. कारण हे देश ट्रम्प यांच्या नव्या नीतीचे शिकार बनू शकतात. अमेरिका या सर्व देशांबरोबर मोठे व्यापारी नुकसान सोसत आहे. ब्ल्यूमबर्गमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिका १२ देशाच्या ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिपमधून बाहेर पडली आहे. त्याचबरोबर त्यांनी जपान, चीन आणि दक्षिण कोरियाच्या व्यापार नीतीवर टीका केली आहे. अमेरिका आपल्या नव्या कर सुधारणांमध्ये आयात वस्तूंवर अतिरिक्त कर लावण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या या वाटचालीवर चिंता व्यक्त केली जात आहे. याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.

ज्या देशांबरोबर व्यापार करण्यात अमेरिका नुकसानीत आहे. त्या देशांच्या या निर्णयाचा मोठा परिणाम होऊ शकतो. ट्रम्प यांचे राष्ट्रीय व्यापार समितीचे प्रमुख पीटर नॅवरो आणि वाणिज्य सचिव विल्बर रॉस यांनी गेल्यावर्षी एक अहवाल प्रकाशित केला होता. त्यात त्यांनी अमेरिकेच्या व्यापारी नुकसानीवर मोठी टीका केली होती. एशियन ट्रेड सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डेब्युरा एम्स म्हणाले, आशियातील बहुतांश सर्वच देश अमेरिकेला मोठी निर्यात करतात. व्यापारी नुकसानीमुळे ट्रम्प हे कधीही कठोर पाऊल उचलू शकतात. कदाचित दुसरे देश याबाबत सावधही नसतील.
भारताचा विचार केला तर अमेरिकेबरोबर डब्ल्यूटीओच्या नियमानुसार आणि २००५ च्या व्यापारी नीती समितीच्या आधारे होते. त्यानंतर भारत-अमेरिकेतील व्यापार २००५ मध्ये २९ बिलियन डॉलरवरून वाढून २०१५ मध्ये ६५ बिलियन डॉलर झाला. भारत मोठ्याप्रमाणात अमेरिकेत माहिती तंत्रज्ञान सेवा, टेक्सटाईल, मौल्यवान दगडांची निर्यात करतो. अमेरिकेला भारताबरोबरील मोठे नुकसान होते. तरीही आतापर्यंत ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील नाते चांगले आहे. परंतु मोदी आणि ट्रम्प यांच्यात व्यापारासंबंधी अजून चर्चा झालेली नाही.