Menu

अपराध समाचार
पुण्यातील नऊ नामांकित डॉक्टरांच्या घर-क्लिनिकवर आयकरचे छापे

nobanner

पुणे आयकर विभागाच्या गुन्हे अन्वेषण पथकाने पुण्यातील नऊ नामांकित आणि तज्ज्ञ डॉक्टरांचं निवासस्थान आणि क्लिनिक्सवर छापे टाकले. नोटाबंदीच्या काळात नोटांचा भरणा आणि बिलिंग यांच्यात विसंगती आढळल्यामुळे हे छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे.

शनिवारी सकाळी आणि दुपारी पुण्यातील डॉक्टरांच्या घरी आणि क्लिनिक्सवर छापेमारी करण्यात आली. अधिकाऱ्यांकडून दिवस-रात्र डॉक्टरांची झडती आणि चौकशी सूरु होती. यामध्ये काही डॉक्टर शहरातील नामांकित रुग्णालयांमध्ये काम करतात, तर काही स्वतःच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करत आहेत. यापैकी दोन डॉक्टर जोडपी आहेत. अचानक नऊ डॉक्टरांवर आयकर विभागाच्या पडलेल्या या छाप्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे

नऊही डॉक्टर शहरातील नामांकित रुग्णालयात कार्यरत असून नोटाबंदीच्या काळात नोटांचा भरणा व बिलिंग यांच्या माहितीत आढळलेल्या विसंगतीमुळे हे छापे टाकण्यात आल्याची माहिती आयकर विभागाचे (गुन्हे अन्वेषण विभाग) अतिरिक्त आयुक्त राजेश महाजन यांनी दिली.