Menu

मनोरंजन
रेखा-विनोद मेहराने सर्वांच्या नकळत लग्न केले तेव्हा..

nobanner

हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये विविध अभिनेते आजवर प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी ठरले आहेत. अशाच काही अभिनेत्यांची चित्रपटसृष्टीतील कारकिर्द मोठी नसली तरीही आपल्या छोट्या कारकिर्दीतही या कलाकारांनी त्यांची छाप सोडली आहे. असाच एक अभिनेता म्हणजे विनोद मेहरा. १३ फेब्रुवारी १९४५ मध्ये अभिनेता विनोद मेहराचा जन्म झाला होता. ‘रागनी’ या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून विनोद मेहरा यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं ज्यामध्ये त्यांनी किशोर कुमार यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती.
१९७१ ला प्रदर्शित झालेल्या ‘एक थी रिटा’ या चित्रपटाद्वारे विनोद मेहरा यांनी मुख्य भूमिका साकारली होती. ‘ऐलान’, ‘घर’, ‘नागिन’, ‘अनुरोध’, ‘अमर दीप’ या विविध धाटणीच्या चित्रपटांतून विनोद मेहरा यांनी आपला असा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. चित्रपटसृष्टीमध्ये कारकिर्दीत सुगीचे दिवस सुरु असतानाच विनोद मेहरा यांनी वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रुपेरी पडद्यावर गाजलेल्या या अभिनेत्याचे खासगी आयुष्यही तितकेच वादग्रस्त घटनांनी ग्रासलेले होते. वैवाहिक आयुष्य आणि चित्रपट कारकिर्दीला लागलेल्या उतरत्या कळेमुळे त्यांच्या आयुष्यावरही त्या सर्व घटनांचा परिणाम होत होता. ते पुन्हा एकदा चर्चेत आले ते म्हणजे अभिनेत्री रेखासोबतचे त्यांचे नाते सर्वांसमोर उघड झाल्यानंतर.
आपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. रेखा जेव्हा कलकत्ता येथे विनोद मेहरा यांच्याशी लग्न करून सासरी आल्या त्यावेळी त्यांच्या सासूने त्यांना मारण्यासाठी चप्पल हातात घेतली होती. इतकेच नाही तर त्यांना घराबाहेरही हकलवून लावले होते. ही एक अशी घटना आहे ज्यास स्वतः रेखादेखील विसरणे अशक्य आहे. रेखा यांच्या आयुष्यातील अशा अनेक गोष्टी यासिर उस्मान यांच्या ‘रेखाः द अनटोल्ड स्टोरी’ पुस्तकात सांगण्यात आल्या आहेत.
कलकत्ता येथे लग्न केल्यानंतर रेखा आणि विनोद मेहरा हे मुंबईला आले. त्यानंतर ते थेट त्यांच्या घरी पोहचले. त्यावेळी रेखा यांच्या आयुष्याला मोठी कलाटणी आली. मेहरा रेजिडेंस येथे पोहचताच रेखा त्यांच्या सासूचा म्हणजेच कमला मेहरा यांचा आशिर्वाद घेण्यासाठी गेल्या. त्या पाया पडण्यासाठी वाकताच कमला यांना त्यांना हटकले. तसेच, त्यांना घरात प्रवेश देण्यासही नकार दिला. कमला यांना राग अनावर झाल्याने त्यांनी रेखांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा विनोद यांनी आपल्या आईला समजवण्याचा बराच प्रयत्न केला. पण त्यांनी काहीच ऐकले नाही. उलट त्यांनी पायातली चप्पल काढून रेखा यांना जवळपास मारण्याचाच प्रयत्न केला. आपल्या सासूच्या अशा वागण्याने रेखा अचंबित झाल्या होत्या. आजूबाजूची सर्व मंडळी जमली होती. रेखा यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या तेथून नंतर निघून गेल्या. पण विनोद मात्र तिथेच आपल्या आईला समजवत राहिले. रेखासोबत विनोद मेहराचे हे तिसरे लग्न होते. पण, त्यांचे नाते जास्त दिवस टिकले नाही.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.