Menu

खेल
विजेंदरच्या ठोशाला चीनचा बॉक्सर घाबरला?

nobanner

भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंह याचा पुढील प्रतिस्पर्धी असलेला चीनचा झुल्फिकार मैमैतियाली याने कोणतेही कारण न देता शुक्रवारी विजेंदरच्या विरोधात लढण्यास नकार दिला आहे. झुल्फिकार आणि विजेंदरमध्ये १ एप्रिलला सामना होणार होता. आता हाच सामना नियोजित कार्यक्रमानुसार अन्य प्रतिस्पर्ध्यासोबत मुंबईत होईल. झुल्फिकारने ऐनवेळी खेळण्यास नकार दिल्याने आता त्याच वजनी गटातील आंतरराष्ट्रीय खेळाडूचा शोध घेण्याचे प्रयत्न विजेंदर सिंहच्या प्रवर्तकांनी सुरू केले आहेत.

भारतीय बॉक्सर विजेंदर सिंह याच्याकडे डब्ल्यूबीओ आशिया-पॅसिफिक बेल्ट आहे, तर चिनी बॉक्सर झुल्फिकारकडे डब्ल्यूबीओ ओरिएंटल किताब आहे. या दोघांमध्ये सामना झाला असता तर विजेत्याला आपल्या प्रतिस्पर्ध्याचा किताब पटकावता आला असता. विजेंदरची प्रवर्तक कंपनी असलेली आयओएस बॉक्सिंग प्रमोशन यांनी सांगितले की, झुल्फिकार याने सामन्यातून माघार घेण्याबाबतचे कोणतेही कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. विजेंदर सिंह याच्यासोबत या वर्षाच्या अखेरिस सामना खेळणार आहे, इतकेच त्याने सांगितले आहे.
विजेंदर सिंह १ एप्रिलला रिंगमध्ये उतरणार आहे. चीनच्या बॉक्सरने माघार घेतल्याने त्याच वजनी गटातील आंतरराष्ट्रीय खेळाडूचा शोध घेण्याचे काम प्रवर्तकांकडून सुरू आहे. मी कोणतीही गोष्ट सकारात्मकतेने स्वीकारतो. झुल्फिकारने माघार घेतली असली तरी त्यामागे काही कारण असू शकते. माझा जो कुणी पुढील प्रतिस्पर्धी असेल, त्याच्यासोबत लढण्यास मी सज्ज आहे. माझे प्रवर्तक त्यासाठी काम करत आहेत. प्रतिस्पर्धी खेळाडूचा शोध घेण्यात ते नक्कीच यशस्वी ठरतील, असा मला विश्वास आहे. माझ्याशी लढण्यास कोणीही तयार असेल तरी ते आव्हान स्वीकारण्याची माझी तयारी आहे, असे विजेंदर सिंह याने सांगितले.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.