Menu

अपराध समाचार
विलेपार्लेतील डॉक्टर तरुणीच्या मारेकऱ्याला प. बंगालमधून अटक

nobanner

मुंबईतल्या विलेपार्लेतील डॉक्टर श्रद्धा पांचाळ हिच्या मारेकऱ्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. देवाशिष धारा या आरोपीला पश्चिम बंगालच्या मिदनापूरमधून अटक करण्यात आली.

हत्येच्या रात्री घरात एकट्याच झोपलेल्या श्रद्धानं दरवाजा नीट बंद केला नव्हता आणि याचाच फायदा घेत देवाशिषनं तिच्या खोलीत प्रवेश केला. जीन्सनं गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यानं तिच्यावर बलात्कार केला आणि तिच्या शरीरावर पेटते कागद टाकून फरार झाला.

शंभराहून अधिक सीसीटीव्हींचा तपास आणि पाचशेहून अधिक लोकांची चौकशी केल्यानंतर 55 दिवसांनी पोलिस मारेकऱ्यापर्यंत पोहचण्यात यशस्वी झाले आहेत.

मुंबईतील विलेपार्ले परिसरात 5 डिसेंबरच्या रात्री 25 श्रद्धाचा मृतदेह राहत्या घरी आढळला होता. मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता आणि तिच्यावर हत्येपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांना होता.

ज्यावेळी श्रद्धाची हत्या झाली होती, त्याच सुमारास संशयित तिच्या इमारतीबाहेर फिरताना दिसत आहे. तळमजल्यावरील खिडकीतून डोकावण्याचा आणि पहिल्या मजल्यावर चढण्याचा प्रयत्न करत असल्याचं फुटेजमध्ये दिसत होतं.

श्रद्धा विलेपार्लेमधील लीलाबाई चाळीच्या पहिल्या मजल्यावरील खोली अभ्यास आणि राहण्यासाठी वापरत असे. तर आई-वडील आणि लहान बहीण तळमजल्यावर राहायचे. तिला खोली आतून बंद न करण्याची सवय होती, असं पोलिसांनी सांगितलं.

श्रद्धा रात्री मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर गेली होती आणि 12 च्या सुमारास घरी परतली. तिला सोडण्यासाठी आलेले तिचे काही मित्र थोड्या वेळाने निघून गेले. पण रात्री साडेतीनच्या सुमारास रुममधून धूर येत असल्याचं दिसलं. आग लागल्याचं समजताच शेजारी आले आणि त्यांनी रुमचा दरवाजा उघडला. पण समोर त्यांना श्रद्धाचा मृतदेह आढळून आला.