Menu

देश
आतापर्यंत ७० हजार कोटींचा काळा पैसा आला बाहेर- न्या. पसायत

nobanner

आतापर्यंत ७० हजार कोटी रूपयांचा काळा पैसा समोर आल्याची माहिती काळ्या पैशांचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) उपाध्यक्ष न्यायमूर्ती अरिजित पसायत यांनी दिली. यासंबंधीचा सहावा अहवाल एप्रिल महिन्यात सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केली जाईल, असेही ते म्हणाले. या ७० हजार कोटींपैकी १६ हजार कोटी रूपये हे ग्लोबल लिक्सनंतर सुरू करण्यात आलेल्या तपासात सापडले असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक प्रकरणांशी संबंधित काम करणाऱ्या अनेक सरकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्याचे पसायत यांनी म्हटले. एसआयटी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाला आपला अहवाल सोपवणार आहे.

गत दोन वर्षांत एसआयटीने काळा पैसा निर्माण होण्याच्या पद्धतीच्या तपासासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत. आमच्या अनेक शिफारशी केंद्र सरकारने स्वीकारल्या आहेत. काळ्या पैशांवर लगाम लावण्यासाठी काही अन्य प्रकारांवरही आमचा विचार सुरू आहे, असे ते म्हणाले. तसेच १५ लाख रूपये किंवा त्याहून अधिकची अघोषित रक्कम जवळ बाळगण्यास मनाई करण्याच्या निर्णयावरही गंभीरपणे विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने यापूर्वीच ३ लाख किंवा त्याहून अधिकचे रोखीचे व्यवहार हे बेकायदा असल्याचे जाहीर केले आहे. खासगी शिक्षण संस्था, सराफ व्यापारी, बांधकाम क्षेत्रातील कंपन्या, महाराज मंडळी आणि माफियांविरोधात तपास करणाऱ्या त्या-त्या राज्यातील गुन्हे शाखांना त्यांच्याकडील अहवाल अमंलबजावणी संचलनालय आणि प्राप्तिकर विभागाला देण्यास सांगितले असल्याचे ते म्हणाले.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.