देश
मुंबईचं बजेट : शिवसेनेच्या वचननाम्यातील काय आहे, काय नाही?
मुंबई महापालिकेचा 2017-18 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. 25 हजार 141 कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी स्थायी समितीसमोर मांडला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात तबब्ल 12 हजार कोटींची घट झाली आहे.
मुंबईचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर, आता चर्चा सुरु झाली आहे ती म्हणजे शिवसेनेच्या वचननाम्यातील कोणत्या गोष्टी अर्थसंकल्पात आहेत. कारण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेने मोठ्या आवेशात अनेक घोषणा केल्या होत्या. मात्र, प्रत्यक्ष अर्थसंकल्पात या घोषणा उतरल्या आहेत का, हे पाहूया :
शिवसेनेच्या वचननाम्यातील कोणत्या गोष्टी अर्थसंकल्पात समाविष्ट आहेत?
स्वातंत्र्य संग्रामाच्या संग्रहालयासाठी तरतूदनवीन उद्यानेसॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनडंपिंग ग्राऊंड कचरा प्रक्रिया केंद्रमलनि:सारण वाहिन्यांची व्याप्ती वाढवणारमलजल प्रक्रिया केंद्रगारगाई पिंजाळ प्रकल्प, कोस्टल रोड, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमाहूल पंपिंग स्टेशनसाठी तरतूदशालेय विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवासजलतरण तलाव
शिवसेनेच्या वचननाम्यातील कोणत्या गोष्टी अर्थसंकल्पात समाविष्ट नाहीत?
पालिकेच्या बजेटमध्ये 500 चौरस फूटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यासंदर्भातील तरतूद नाही500 ते 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांनाही मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणाही हवेतचविनामूल्य आरोग्यसेवा देणारी बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजनामधुमेहांवर उपचार करणारी विशेष रूग्णालयेआरोग्यसेवा आपल्या दारीबहुरूग्णवाहिकाजेनेरीक मेडिसिन दुकानेरात्री कचरा उचलण्याची सोयजुन्या विहिरींचे पुनर्जिवित करणेबेस्ट कर्मचाऱ्यांना विमा कवचपशू आरोग्य सेवामहापालिका कर्मचाऱ्यांसाठी घरकूल योजनासफाई कर्मचाऱ्यांसाठी अत्याधुनिक साहित्यफूटबॉल मैदाने व आंतरराष्टृीय नेमबाज केंद्रगोवंडी येथे आंतरराष्टृीय दर्जाचे केंद्रगावठाण, कोळीवाडे येथील सीआरझेडमधील मूळ बांधकामे अधिकृत करणार