राजनीति
शिवसेना दिल्लीत महानगर पालिकांना निवडणूक लढविणार
शिवसेनेने दिल्लीत महानगर पालिका निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. सेनेकडून १५० उमेदवार रिंगणात उतरविले जाणार आहेत. पालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. त्यामुळे शिवसेना या निवडणुकीत उतरल्याने अधिक रंगत येणार आहे.
मुंबईत महानगर पालिकेत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेना आता दिल्लीमध्येही आपले अस्तित्व दाखवण्याच्या तयारीत आहे. एप्रिल महिन्यातदिल्लीमधील महानगर पालिकांच्या निवडणुका होत आहेत.
भाजपचे सुमारे 150 नाराज नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा दिल्लीचे शिवसेनेचे प्रभारी चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत खैरे आणि अनिल देसाई यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेने या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केल्याची माहिती आहे. ‘मुंबई तो हमारी है, अब दिल्ली की बारी है’ अशा घोषणा देण्यात आल्यात.
दरम्यान, मुंबईत महापालिकेत पारदर्शकतेच्या मुद्द्यावर शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना दिल्ली महानगर निवडणुकीत उतल्याचे म्हटले जात आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.