देश
सांगली जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच भाजपची सत्ता; अध्यक्षपदी संग्रामसिंह देशमुख
राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी आज निवडणुका होत आहेत. कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, रायगड, सोलापूर, औरंगाबाद, नाशिकसह इतर जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी कमालीची चुरस आहे. अनेक ठिकाणी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता अधिक आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वास उर्फ नाना देवकाते आणि उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील यांची निवड निश्चित मानली जात आहे. सिंधुदुर्गात रेश्मा सावंत यांनी अध्यक्षपदासाठी आणि रणजित देसाई उपाध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांचा, तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे सुहास बाबर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी सत्यजित देशमुख यांनी, तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेणाऱ्या शिवसेनेमध्ये फूट पडली आहे. चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेच्या १० पैकी सहा सदस्यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेत ‘कमळ’ फुलणार हे स्पष्ट झाले आहे. तर पक्षातील दुफळीनंतर शिवसेनेतील स्थानिक नेत्यांनी जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना सहभागी होणार नाही असे जाहीर केले आहे. कोल्हापूर जिल्हापरिषदेच्या ६७ जागा असून यामध्ये भाजपला १४, काँग्रेसला १४, राष्ट्रवादीला ११ आणि शिवसेनेला १० जागा मिळाल्या आहेत. अध्यक्षपद मिळवण्यासाठी ३४ जागांची आवश्यकता आहे. कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. कोल्हापूरमध्ये भाजपची सत्ता येणार असा दावा नेते करत होते. मात्र सोमवारी शिवसेनेने भाजपऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार असे जाहीर करत भाजपला धक्का दिला होता. भाजपकडून त्रास झाल्याने सोबत न जाण्याचा निर्णय घेतला असे सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांनी म्हटले होते. अवघ्या २४ तासांमध्ये शिवसेनेत फूट पडली. मंगळवारी सकाळी शिवसेनेचे ३ आमदार त्यांचे सहा सदस्य घेऊन चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला गेले होते. या भेटीनंतर सहा सदस्यांनी भाजपला पाठिंबा देऊ असे जाहीर केले. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने शिवसेनेला अध्यक्षपदाची ऑफरही दिली होती मात्र काँग्रेसचे संख्याबळ जमत नव्हते. तर काँग्रेसला पाठिंबा देण्यावर शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी होती.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.