कर्नाटकमध्ये ‘बाहुबली 2’ चा विरोध, कटप्पाचा माफीनामा
- 458 Views
- April 21, 2017
- By admin
- in Uncategorized
- Comments Off on कर्नाटकमध्ये ‘बाहुबली 2’ चा विरोध, कटप्पाचा माफीनामा
- Edit
‘बाहुबली 2 – द कन्क्लूजन’ चित्रपटाबाबत कर्नाटकमध्ये वाढता विरोध पाहून कटप्पा अर्थात अभिनेता सत्यराज यांनी माफी मागितली आहे. सत्यराज यांनी ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करुन कर्नाटकच्या लोकांची माफी मागितली आहे.
दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या ‘बाहुबली 2’ सिनेमाची प्रेक्षक चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. आता सिनेमा प्रदर्शनासाठी तयार असून वाद मात्र सुरुच आहेत.
सुमारे 9 वर्षांपूर्वी तामिळनाडू आणि कर्नाटकशी संबंधित कावेरी नदी वादात सत्यराज यांनी कन्नडविरोधी विधान केलं होतं. त्यामुळेच कर्नाटकमध्ये सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत वाद उफाळला आहे.
मात्र तामिळ लोकांच्या विकासाबाबत कायमच बोलणार. मग यासाठी इंडस्ट्रीमध्ये मला कोणी काम दिलं नाही, तरी काही फरक पडणार नाही, असंही सत्यराज यांनी माफीनाम्यात सत्यराज स्पष्ट केलं.
कर्नाटकमध्ये बाहुबली 2 चा विरोध सुरु आहे आणि सिनेमा प्रदर्शित न करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर काही स्थानिक पक्षांनी बाहुबली दोन राज्यात रिलीज न करण्याची भूमिका घेतली आहे.
तर यापूर्वी राजामौली यांनी एक व्हिडीओ पोस्ट करुन कर्नाटकच्या लोकांना सिनेमा प्रदर्शित होऊ द्यावा, असं आवाहन केलं होतं. आता 28 एप्रिल रोजी कर्नाटकमध्ये ‘बाहुबली 2’ प्रदर्शित होणार की नाही हे पाहणं उत्सुकतेचं असेल.