खेल
झहीर-सागरिकाला शुभेच्छा देताना कुंबळेंकडून मोठी चूक
nobanner
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या साखरपुड्याच्या वृत्तानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. मात्र झहीर आणि सागरिकाला शुभेच्छा देताना टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा गोंधळ उडला.
साखरपुड्याच्या शुभेच्छा देताना अनिल कुंबळे यांनी सागरिका घाटगेला टॅग करण्याऐवजी पत्रकार सागरिका घोष यांना टॅग केलं. मात्र चुकी लक्षात आल्यानंतर त्यांनी ट्वीट डिलीट केलं आणि दुसरं ट्वीट करुन अभिनेत्री सागरिका घाटगेला टॅग केलं.
Share this: