मनोरंजन
बॉयफ्रेंडला ड्रेसिंग सेन्स न आवडल्यामुळे अभिनेत्रीने केला ब्रेकअप
सध्या ‘कोई लौट के आया है’ या मालिकेत झळकत असलेली श्रीजिता डे ही टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने ‘लव्ह का दी एण्ड’ आणि ‘मान्सून शूटआउट’ या चित्रपटांमध्येही काम केले होते.
नुकतीच तिने टाइम्स ऑफ इंडियाला एक मुलाखत दिली. त्यात आपल्या भूतकाळाबद्दल खुलेपणाने बोलणाऱ्या श्रीजिताने तिच्या पूर्वाश्रमीच्या इंजिनिअर प्रियकराबद्दलही सांगितले. हे दोघेजण एकमेकांसाठी कसे अनुरुप नव्हते. तसेच, त्याला श्रीजिताने केलेल्या करिअरची निवड आणि ड्रेसिंग सेन्सचा कसा त्रास व्हायचा याचाही तिने खुलासा केला. श्रीजिता म्हणाली की, त्याचे प्रेम मिळवण्यासाठी मला स्वतःला पूर्णपणे बदलावे लागेल हे मला सुरुवातीला त्याला डेट करताना माहित नव्हते. त्याच्या मनाप्रमाणे मी स्वतःला बदलावं असंच त्याला वाटायचं. मी काम करत असलेलं क्षेत्र त्याला आवडत नव्हतं. त्याचबरोबर त्याने मला कपडे घालण्याची पद्धतही बदलायला लावली. मी सेटवर काय करतेय, कोणासोबत वेळ घालवतेय याची सगळी माहिती तो मागायचा. मी पार्टीला किंवा कुठेही फिरायला गेलेले त्याला आवडायचं नाही. त्यामुळे मी बऱ्याचदा घरीच असायचे. माझ्यासाठी माझं स्वातंत्र्य खूप महत्त्वाचं होतं आणि त्याच्या वागण्याचा मला त्रास होऊ लागला होता.
प्रियकराची पदवी आणि त्याला मिळत असलेल्या मोठ्या रक्कमेच्या धनादेशामुळे आपण कधीच सुखी राहू शकत नाही. त्याच्या वागण्यात कधीच बदल येणार नाही, याचीही जाणीव झाल्याचे श्रीजिताने सांगितले. एखाद्या व्यक्तीने घातलेल्या अटींवर स्वतःच आयुष्य जगणं तिला पटत नव्हतं. त्यामुळे अशा नात्यातून तिने वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.