Menu

अपराध समाचार
शिर्डीत चार ठिकाणी दरोडा, मारहाणीत वृद्ध महिलेचा मृत्यू

nobanner

शिर्डी जवळील एका गावात दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. एकाचवेळी चार ठिकाणी दरोडा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

शिर्डी जवळील अस्तगाव येथील नळे वस्ती जवळ चार ठिकाणी हा दरोडा पडला. दरोडेखोरांच्या मारहाणीत देवबाई शिवाजी खिल्लरी (५५) यांचा मत्यू झाला. दरोडेखोरांनी चार जणांना जबर मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्यांवर शिर्डीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.