Menu

अपराध समाचार
हळदीच्या कार्यक्रमात उशिरापर्यंत डीजे, पोलिसांचा लाठीचार्ज

nobanner

नवी मुंबईतील हळदीच्या कार्यक्रमात पोलिसांनी लाठीचार्ज केला. कोपर खैराणेमध्ये हा प्रकार घडला.

कोपर खैराणे गावात कुंदन म्हात्रे यांच्या हळदीचा कार्यक्रम सुरु होता. परंतु रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी असताना तीन वाजेपर्यंत डीजे सुरु होता. त्यामुळे डीजे जप्त करायला गेलेल्या पोलिसांची नागरिकांसोबत बाचाबाची झाली. त्यामुळे लाठीचार्ज करावा लागल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं आहे.

या घटनेत नवरदेवाच्या आई-वडिलांसह पाच जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे. यानंतर काही नागरिकांनी पोलिसांच्या गाडीचीही तोडफोड केली.