अपराध समाचार
हिंगोलीजवळ खासगी बस- ट्रकचा भीषण अपघात, सहा ठार
- 218 Views
- April 02, 2017
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on हिंगोलीजवळ खासगी बस- ट्रकचा भीषण अपघात, सहा ठार
- Edit
nobanner
हिंगोलीतील कळमनुरीजवळ खासगी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या अपघातात सहा जण जागीच ठार झाले असून सात प्रवासी गंभीर जखमी आहेत.
कळमनुरीजवळील पारडी मोडववर रविवारी सकाळी खासगी बस आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात सुमारे ३० जण जखमी झाले आहेत. यातील सात जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर नांदेड आणि हिंगोलीतील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. खासगी बस ही खुराणा ट्रॅव्हल्सची होती. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
Share this: