देश
१० मेनंतर प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार
nobanner
कंसोरटियम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्स म्हणजेच सीआयपीडीनं १० मेनंतरच्या प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तेल कंपन्यांकडून वारंवार होणाऱ्या दुर्लक्षाला कंटाळून सीआयपीडीनं हे पाऊल उचललं आहे.
नोव्हेंबर २०१६मध्ये मुंबई आणि मार्च २०१७मध्ये दिल्लीमध्ये सीआयपीडी आणि पेट्रोल कंपन्यांबरोबर बैठक झाली पण या बैठकीत कोणत्याही समस्येवर तोगडा निघाला नाही, त्यामुळे १० मे नंतरच्या प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं सीआयपीडीनं सांगितलं आहे.
यानंतरही पेट्रोल कंपन्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर रात्रीही पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही घेऊ शकतो, असा इशाराही सीआयपीडीनं दिला आहे. सीआयपीडीच्या या निर्णयामुळे देशातले ५३ हजार पेट्रोल पंप बंद राहतील.
Share this: