देश
कार अपघातात अभिनेत्रीसह तिघांचा मृत्यू
nobanner
कार अपघातामध्ये अभिनेत्री रेखा सिंधु हिचा मृत्यू झाला आहे. कन्नड अभिनेत्री रेखा सिंधु हिच्या गाडीला चेन्नई-बंगलुरू हायवेला अपघात झाला. कारमध्ये सिंधु हिच्यासह ४ लोकं होते. अपघातात चौघांचाही जागेवरच मृत्यू झाला आहे.
सिंधु चेन्नई येथून बंगळुरुला चालली होती. या दरम्यान पेरानाम्बुत जवळ तिच्या गाडीला अपघात झाला. त्या कारमध्ये सिंधूसह अभिषेक कुमारन (22), जयाकंदरन (23) आणि रक्षन (20) हे देखील होते. अपघातानंतर लगेचच त्यांना तिरुपत्तुर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
Share this: