Menu

खेल
कैफच्या सडेतोड उत्तराने पाक ट्रोलरची बोलती बंद!

nobanner

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयावर भारताच्या अनेक बड्या व्यक्तींनी आनंद व्यक्त केला. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफनेही याबाबत भारताचं अभिनंदन केलं.

पण कैफच्या ट्वीटनंतर पाकिस्तानमधील अनेक ट्विटराईट्सने ट्रोल केलं. मात्र मोहम्मद कैफनेही चोख प्रत्युत्तर देत त्यांचं तोंड बंद केलं.

अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देऊ नये, असा निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गुरुवारी दिला. या निर्णयानंतर संपूर्ण देशात आनंदाची लाट पसरली.

आयसीजेच्या निर्णयानंतर मोहम्मद कैफने ट्वीट केलं. भारताचं अभिनंदन, आंतरराष्ट्रीय न्यायालायाचे आभार. सत्याचा विजय झाला, असं कैफने ट्वीटमध्ये म्हटलं.

मोहम्मद कैफचं हे ट्वीट पाकिस्तानच्या एका ट्विपलच्या फारच मनाला लागलं. आमीर अक्रम नावाच्या यूझरने कैफच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना नावातून मोहम्मद शब्द हटवण्यास सांगितलं.

यावर कैफनेही चोख प्रत्युत्तर दिलं. “जर मी भारताच्या विजयाचं समर्थन केलं तर मला माझ्या नावातून मोहम्मद हटवायला हवं? मला माझ्या नावावर अभिमान आहे. आमीरचा अर्थ आहे, जीवनात परिपूर्ण. तुलाही त्याची गरज आहे.”

मोहम्मद कैफने यानंतर आणखी एक ट्वीट करुन लिहिलं की, कोणीही कोणत्या धर्माचा ठेकेदार नाही. ठेकेदारांचा कोणाच्याही नावावर कॉपीराईट नाही. भारत सर्वसमावेशक आणि सहिष्णु देश आहे.