अपराध समाचार
गडचिरोलीत ट्रक- जीपच्या अपघातात सहा ठार
- 236 Views
- May 07, 2017
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on गडचिरोलीत ट्रक- जीपच्या अपघातात सहा ठार
- Edit
nobanner
गडचिरोलीत ट्रक आणि जीपच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी पहाटे घडली. या अपघातात आठ जण जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोलीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गडचिरोलीतील सिरोंचा मार्गावर उमानूरजवळ रविवारी पहाटे मॅक्स जीप आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की जीपमधील सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. जीपमध्ये एकू १४ प्रवासी होते. उर्वरित आठ जणांवर गडचिरोलीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
अपघातात मृत्यू झालेले सर्व जण हे सिंरोचा तालुक्यातील लग्नकार्य आटपून गावी परतत होते. या अपघातात चार वर्षांचा मुलगा बचावला आहे. मृतांचे नावे अद्याप समजू शकलेली नाही.
Share this: